एक कहाणी.. एका कट्ट्याची .. कटिन्ग मधल्या निघालेल्या वाफेची.. नकळत बान्धलेल्या नात्याची ..दिलेल्या एका वचनाची.. कहाणी एका माझी ..एका कोलेजची..

Wednesday, April 27, 2011

२. अनोळखी ओळख

तो स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत होता आणि मी माझे DOCUMENTS !! त्याला रडू फूटतही होतं पण नाक्यावरच्या गोंधळात त्याच्या  हुंदक्याला आवाज फुटत नव्हता.मी त्याचा जवळ गेलो आणि त्याने मला एक कळवळून मिठी मारली! हे दुसरे सुलभसख्य दृश्य त्या नाक्यावरच्या गोंधळात मिसळून गेलं ह्याचं मला हायसं वाटलं.मला आता अशा वेळी नेमकं काय करायचं असतं हे सूचत नाही. तेवढ्यात तो मटकन कट्ट्यावर बसला.
                       "I AM SORRY .." मी दिलेल्या रुमालाने  डोळ्यांच्या कडा पुसत तो म्हणाला. आपल्याला आवडणाऱ्या मुलीला दुसऱ्याच्या मिठीत पाहिल्यानंतर ' SORRY ' ह्या शब्दाशिवाय दुसरं काही येणं तसं कठीणच! ते ' SORRY '  नेमकं आपण आपल्यालाच म्हटलेलं असता की आपल्यामुळे दुसऱ्यांना झालेल्या त्रासामुळे हे कळणंही कठीण असतं.अशा अनेक आंतरिक प्रश्नांची उत्तरं मला  अजूनही सापडलेली नाहीत.
                        "IT 'S OK .ACTUALLY माझे DOCUMENTS .."   "साला.. हे असंच असतं" मला तोडून तो एकदम म्हणाला ," मी तिला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला.. तरीही..तिच्यावर एवढं प्रेम करून सुद्धा.. मी तिला वचन दिलेलं..कि असं कधी मी परत भांडणार नाही..मी एवढं सांगून..तिने ..मलाच फाट्यावर .." , मी काही बोलेपर्यंत असं बोलून तो  हमसून रडायला लागला. आतापर्यंत  माझा रुमाल त्याचा व्यथेने चिंब भिजून गेला होता. त्यात भर म्हणून त्याने रुमालाला शिंकरून मला त्याचा DNA दिला होता. मी त्याचा बाजूला बसून त्याचा खांद्यावर हात ठेवून त्याला समजवण्याचा बराच निष्फळ केला. परत एकदा हातातलं घड्याळ टोचायला लागलं. एक वाजून गेला होता. त्यामुळे कार्यालयीन वेळ कधीच संपली होती. त्या  मुलीने  तिच्या नवीन प्रियकरासोबत कधीच पलायन केलेलं होतं!!  तिचे आणि माझे  काहीरती जुने  हिशोब चुकते झाले नसतील बहुदा!  कारण तिने तिच्या जुन्या प्रियकराला माझ्या DOCUMENTS सकट मला सोपवलं होतं.                             
                       मग आमची ओळख झाल्यानंतर त्या धावपटूच नाव आदित्य शृंगारपुरे आहे अशी माहिती मिळाली. त्याच्या आडनावातच त्याची पत्रिका लिहिली होती. कॉलेज च्या पहिल्या दिवशी हा असा 'शृंगार' बघून तो तूर्त 'पूरला' असं म्हणायला काही हरकत न्हवती आणि  कॉलेज बद्दल असणारं कुतूहल, ते प्रत्यक्षदर्शनानंतरच अदभूत कॉलेज,ते प्राचार्यांच्या कार्यालयाच्या बाहेरील बेंचवरचं  मनाला भुरळ पाडणारं  हास्य, माझ्या ओल्या रुमालाची विभित्स अवस्था, वाचमेन काकांचा क्रोध आणि सगळ्यांमधून माझा  'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीला धरून मी ठेवलेला शांत स्वभाव ;  या  सर्व गोष्टीनी जवळ जवळ नवरसांचा प्रात्यक्षिक अनुभव मला पहिल्याच दिवशी दिला होता. आदित्य हा इसम नेहमी चावडीवर नुसती बिडी ओढत बसलेल्या  माणसासारखा मला भासायचा. . म्हणजे , आजूबाजूच्या गोष्टींचा ठावठिकाणा नसताना सरकारवर  यथेच्छ टीकास्त्र झाडायचं . पण याच समीक्षकाने मला कॉलेज  समोरच्या DP's नावाच्या हॉटेल मध्ये ब्रेकअप ट्रीट दिली. त्या दिवसासाठी समोरची फ्रुट बीअर त्याने एका घोटात संपवून त्याचं सांकेतिक दुःख त्याचा या हालचालीवरून मला दाखवलं होतं. च -भ ची बाराखडी ही  त्याच्या जिभेला सुतळीने बांधूनच ठेवली होती जणू!! प्रत्येक वाक्याचा उदय आणि समारोप ह्या  मंगल शब्दांनीच व्हायचा.हातातली  मार्कशीट माझ्याकडे केविलवाणी बघत  होती. AADMISSION साठी परत उद्या येणं भाग होतंच आणि घरी गेल्यावर ADDMISSION न झाल्यामुळे पिताश्रींची पितृगाथा ऐकावी लागणार होती.पण ह्या अनोळखी वल्लीची ओळख मला कसलेतरी संकेत देत होती हे नक्की... 

Tuesday, April 26, 2011

१.पहिली पायरी चढताना ..

आयुष्यात  अन्न (फुकट ) आणि डोळ्यावरची झोप  या दोन गोष्टींसाठी माणूस काहिही करण्यासाठी तयार होईल. म्हणजे आपल्या देशात जर लोकांना ब्र्हष्टाचार  करायचाच असेल तर लाचस्वरुपात देण्यासाठी या गोष्टी पुरेशा असतील.निदान मी तरी ही लाच आनंदाने स्वीकारीन ! दहावीची परीक्षा बऱ्याच प्रयत्नानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर रुईआ  महाविद्यालयात मी दाखल झालो. काही जणांना मी ' दाखल केलो ' गेलो असं  वाटलं. हा गैरसमज बऱ्याच  काळानंतर दूर झाला. त्यासाठी मला माझ I -CARD बरच उपयोगी पडलं. कॉलेज च्या ADDMISSION च्या दिवशी मी माझ्या दैनंदिन सवयीप्रमाणे  जरा उशिराच पोहोचलो. तेव्हा रुईआ नाक्याबद्दल मी बराच ऐकून होतो. नाका गजबजून गेला होता. अनेक अनोळखी चेहऱ्यांचा मी पाठलाग करत होतो.शेवटी कॉलेज च्या गेट पाशी मी पोहोचलो. हा गेट ओलांडाण्यापूर्वी मी मनाशी एक पक्का निर्धार केला कारण , एका वेगळ्याच जगात मी प्रवेश करणार होतो.अनेक वलये  माझ्या भोवती अचानकपणे निर्माण झाल्यासारखं मला काहीसं वाटू लागलं. अनेक बायका नवारी साड्यांमध्ये मला ओवाळंण्यासाठी हातात हार आणि निरांजनाचं  ताटच जणू घेऊन आल्या आहेत असं वाटत असताना मला गेट वरच्या वाचमेन ने अडवलं आणि  मी भानावर आलो. बऱ्याचवेळानंतरच्या वाटाघाटी नंतर माझं न ऐकता मला थेट PRINCIPAL च्या OFFICE मध्ये दाखल करण्यात आलं.  थेट प्राचार्यांकडे ..ते  ही  पहिल्याच दिवशी!! तसं म्हणायला गेलं तर  अश्या अनेक भेटींचा मी शाळेत साक्षीदार होतोच म्हणा! घड्याळ बऱ्याच वेळ हाताला टोचत असल्यामुळे वाया जाणारी ती  वेळ आणि बंद होणारं OFFICE या दोन गोष्टी डोळ्यासमोरून हलत नव्हत्या. PRINCIPAL काहीतरी कामात असल्यामुळे मला बाहेरच्या बेंच वर बसण्याशिवाय काही पर्याय न्हवता.
                   माझ्या बाजूला एक ,'प्रत्येकाच्या कथेमध्ये असणारी जशी एक तरुणी असते ' ,तशी एक तरुणी बसली होती.तिचे वर्णन सुद्धा,गोरा रंग ,नितळ कांती ,सुडौल बांधा वैगरे असच होतं.खांद्यावरच्या  झोळीचं मांडीवर वेटोळं  करून त्यावरून आपले स्लीवलेस हातांनी अगदी संपूर्ण शरीर सावरून ती माझ्याबाजूला बसली होती. तिच्या  हातावरचं गुलाबी रंगाच घड्याळ तिच्या पेटंट नाजूकतेची जाणीव करून देत होता.अंगावरचा नारंगी  रंगाचा कुर्ता डोळ्याला सतत ताजं ठेवत होता.म्हणजे तिच्याकडे न बघता जरी मी दुसरीकडे बघीतल तरी तो रंग डोळ्याचा एका  कोपऱ्यामध्ये  मिसळत होता.त्यामुळे तिच्यावरून माझी नजर हटवण म्हणजे पावसात समोर असलेल्या गरम गरम तळलेल्या भजीचा पोटात खड्डा असून सुद्धा नुसता वास घेण्यासारखच होतं. अगदी कठीण ! तिने  चार्ली परफ्युम मारला आहे की स्प्नेझ डिओ हे विचार करत असतानाच समोरचं OFFICE चं दार उघडलं. आणि  मला बोलावण्यात आलं. OFFICE मध्ये बरेच लोक असल्यामुळे नेमके आमचे माननीय प्राचार्य  कोण हे कळायला मार्ग न्हवता. हे सगळं बघेपर्यंत OFFICE चा दरवाजा उघडून एक इसम लगबगीने बाहेर आला आणि माझ्या हातातले सगळे DOCUMENTS पडले..आणि ते त्याच्या DOCUMENTS मध्ये मिसळले गेले माझ्या लक्षात  येई पर्यंत तो चक्क धावतच बाहेर पडला. मी त्याला थांबवणार इतक्यात प्राचार्यांच्या सेवकाने म्हणजेच चपराश्याने मला बोलवलं. मी धावत धावत त्या मुलाचा पाठलाग करताना अनेकांचे आश्चर्याने ,कुतूहलाने ,केविलवाणे ,हसणारे, तुच्छतेने बघणारे  चेहरे मी बघत होतो. त्यात "ती" ,गोरी ,नितळ कांती ,सुडौल बांधा असलेल्या  मुलीचा लाजरासुद्धा चेहरा होता. म्हणजे कॉलेज च्या पहिल्याच दिवशी माझ्याबद्दलची नवरासांची  कल्पना साकार झाली होती.तो इसम नक्कीच शाळेत पळण्याच्या शर्यतीत पहिला  आला असेल. गर्दीतून वाट काढण्याचं तंत्र त्याला अवगत होतं. पहिल्या मजल्यावरून धावत धावत तो  नाक्यावर येऊन पोहोचला आणि मी त्याच्या मागून त्याला थांबवण्याच्या हेतूने मागे धापा टाकत होतो. तो अचानक दचकल्यासारखा थांबला आणि  कट्ट्याचा आधार घेऊन सावरून बसला.त्याच्या  नजरेचा पाठलाग करून तो कुठे बघत होता ह्याचा अंदाज मी घेत होतो.त्याच्या  समोर एक मुलगी एका मुलाला अगदी मिठी मारून बसली होती. ते सुलभशृंगार दृश्य तो हताशपणे  बघत  होता आणि  त्या वेळी मला काहीतरी उमगल्यासारखं झालं. त्याचा डोळ्यातला अश्रू घरंगळून माझ्या DOCUMENTS वर पडला. माझी मार्कशीट त्याच्या अश्रूंनी भिजून निघत होती. 
                    कॉलेज च्या पहिल्या दिवशी कोणाचतरी ADDMISSION होत असताना कोणालातरी   LEAVING CERTIFICATE मिळालेलं होतं...