तो स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत होता आणि मी माझे DOCUMENTS !! त्याला रडू फूटतही होतं पण नाक्यावरच्या गोंधळात त्याच्या हुंदक्याला आवाज फुटत नव्हता.मी त्याचा जवळ गेलो आणि त्याने मला एक कळवळून मिठी मारली! हे दुसरे सुलभसख्य दृश्य त्या नाक्यावरच्या गोंधळात मिसळून गेलं ह्याचं मला हायसं वाटलं.मला आता अशा वेळी नेमकं काय करायचं असतं हे सूचत नाही. तेवढ्यात तो मटकन कट्ट्यावर बसला.
"I AM SORRY .." मी दिलेल्या रुमालाने डोळ्यांच्या कडा पुसत तो म्हणाला. आपल्याला आवडणाऱ्या मुलीला दुसऱ्याच्या मिठीत पाहिल्यानंतर ' SORRY ' ह्या शब्दाशिवाय दुसरं काही येणं तसं कठीणच! ते ' SORRY ' नेमकं आपण आपल्यालाच म्हटलेलं असता की आपल्यामुळे दुसऱ्यांना झालेल्या त्रासामुळे हे कळणंही कठीण असतं.अशा अनेक आंतरिक प्रश्नांची उत्तरं मला अजूनही सापडलेली नाहीत.
"IT 'S OK .ACTUALLY माझे DOCUMENTS .." "साला.. हे असंच असतं" मला तोडून तो एकदम म्हणाला ," मी तिला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला.. तरीही..तिच्यावर एवढं प्रेम करून सुद्धा.. मी तिला वचन दिलेलं..कि असं कधी मी परत भांडणार नाही..मी एवढं सांगून..तिने ..मलाच फाट्यावर .." , मी काही बोलेपर्यंत असं बोलून तो हमसून रडायला लागला. आतापर्यंत माझा रुमाल त्याचा व्यथेने चिंब भिजून गेला होता. त्यात भर म्हणून त्याने रुमालाला शिंकरून मला त्याचा DNA दिला होता. मी त्याचा बाजूला बसून त्याचा खांद्यावर हात ठेवून त्याला समजवण्याचा बराच निष्फळ केला. परत एकदा हातातलं घड्याळ टोचायला लागलं. एक वाजून गेला होता. त्यामुळे कार्यालयीन वेळ कधीच संपली होती. त्या मुलीने तिच्या नवीन प्रियकरासोबत कधीच पलायन केलेलं होतं!! तिचे आणि माझे काहीरती जुने हिशोब चुकते झाले नसतील बहुदा! कारण तिने तिच्या जुन्या प्रियकराला माझ्या DOCUMENTS सकट मला सोपवलं होतं.
मग आमची ओळख झाल्यानंतर त्या धावपटूच नाव आदित्य शृंगारपुरे आहे अशी माहिती मिळाली. त्याच्या आडनावातच त्याची पत्रिका लिहिली होती. कॉलेज च्या पहिल्या दिवशी हा असा 'शृंगार' बघून तो तूर्त 'पूरला' असं म्हणायला काही हरकत न्हवती आणि कॉलेज बद्दल असणारं कुतूहल, ते प्रत्यक्षदर्शनानंतरच अदभूत कॉलेज,ते प्राचार्यांच्या कार्यालयाच्या बाहेरील बेंचवरचं मनाला भुरळ पाडणारं हास्य, माझ्या ओल्या रुमालाची विभित्स अवस्था, वाचमेन काकांचा क्रोध आणि सगळ्यांमधून माझा 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीला धरून मी ठेवलेला शांत स्वभाव ; या सर्व गोष्टीनी जवळ जवळ नवरसांचा प्रात्यक्षिक अनुभव मला पहिल्याच दिवशी दिला होता. आदित्य हा इसम नेहमी चावडीवर नुसती बिडी ओढत बसलेल्या माणसासारखा मला भासायचा. . म्हणजे , आजूबाजूच्या गोष्टींचा ठावठिकाणा नसताना सरकारवर यथेच्छ टीकास्त्र झाडायचं . पण याच समीक्षकाने मला कॉलेज समोरच्या DP's नावाच्या हॉटेल मध्ये ब्रेकअप ट्रीट दिली. त्या दिवसासाठी समोरची फ्रुट बीअर त्याने एका घोटात संपवून त्याचं सांकेतिक दुःख त्याचा या हालचालीवरून मला दाखवलं होतं. च -भ ची बाराखडी ही त्याच्या जिभेला सुतळीने बांधूनच ठेवली होती जणू!! प्रत्येक वाक्याचा उदय आणि समारोप ह्या मंगल शब्दांनीच व्हायचा.हातातली मार्कशीट माझ्याकडे केविलवाणी बघत होती. AADMISSION साठी परत उद्या येणं भाग होतंच आणि घरी गेल्यावर ADDMISSION न झाल्यामुळे पिताश्रींची पितृगाथा ऐकावी लागणार होती.पण ह्या अनोळखी वल्लीची ओळख मला कसलेतरी संकेत देत होती हे नक्की...
No comments:
Post a Comment