एक कहाणी.. एका कट्ट्याची .. कटिन्ग मधल्या निघालेल्या वाफेची.. नकळत बान्धलेल्या नात्याची ..दिलेल्या एका वचनाची.. कहाणी एका माझी ..एका कोलेजची..

Monday, May 2, 2011

३.अपघात

आज कॉलेज चा पहिला दिवस होता. माझा अर्धा वेळ SOCIOLOGY चा क्लास शोधण्यात गेला. कॉलेज च्या पहिल्याच  दिवशी कॉलेज जाणून घ्यायची उत्सुकता जरा शीगेलाच पोहोचली होती. नोटीस बोर्ड जवळ उडालेली झुंबड, ती मधूनच वाजणारी बेल , ती बेल ऐकून उडालेला गोंधळ, स्टाफ रूम बाहेर हातात आशेने सही मिळवण्यासाठी  APPLICATION  घेऊन उभे राहणारे ते चेहरे, स्टाफ रूम बाहेर खुर्ची वर आपलं कायमचं जाळं विणून बसलेला चपराशी ; या सगळ्याने वातावरण अगदी भरून  गेलं होतं. 
               कॉलेजचं कॅन्टीन  शोधायला तसे कष्ट पडत नाहीत.वडापाव हा खाद्यपदार्थ UNIVERSAL असल्याने तो सगळीकडे उपलब्ध आहे.म्हणजेच , तुम्ही कुठेही  गेलात आणि  बटाटेवड्याचा वास हुंगत पाठलाग केला तर समोर आपोआप कॅन्टीन उभं!
             कॅन्टीन ही जागा नेहमीच गजबजलेली असते. ही जागा कधीही   रिकामी दिसणार नाही आणि जरी रिकामी दिसली तरी  भासणार नाही. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला ती जागा आपलीशी वाटायला लागली. आजूबाजूच्या गोंधळामध्ये आणि HANGOUTS मध्ये मी मलाच दिसेनासा झालो. मी जवळची एक खुर्ची ओढून त्यावर बसणार इतक्यात माझ्या खांद्यावर एक हात आला.तो हात मी नखापासून ते दंडापर्यंत न्याहाळला आणि तो हसतमुख मिश्कील चेहरा पाहून मी दचकलोच!!! हा  इसम मला विसारालाही असेल अस मला वाटलेलं. 
                                    "काय मित्रा!!! व्हलखलास  का मला? " हा भाषेचा लहेजा ऐकल्यानंतर मला माझ्या शाळेतल्या कदम सरांची आठवण झाली.कदम सर हे आम्हाला 'शारीरिक शिक्षण ' हा विषय शिकवायचे.ज्याला आम्ही P .T . म्हणत असू. सरांना शाळेतल्या प्रशासकीय गोष्टींचा कंटाळा आला होता. मुख्य तक्रार म्हणजे आमचे मुख्याध्यापक!मुख्याध्यापाकांच्या प्रत्येक हालचालीवर सरांचं अगदी बारीक लक्ष! त्यांना त्यांच्या लंच ब्रेक पासून ते प्रसाधनाच्या प्रत्येक वेळेबाबत खडान  खडा माहिती होती . मग त्यांची बदली झाल्यानंतर आधीचेच बरे होते हे सांगणारं त्यांचं भारुड गाऊन झालं. "मी नोकरीच सोडतो बघ तू " असं खुलं च्यालेंज त्यांनी मला दिलेलं."मला सगळ्यांचा लय कंटाळा आलाय बघ" हे वाक्य तर त्यांचा जुबानी कायमचं शिवलेलं. त्यांच्या सगळ्या तक्रारींमध्ये मी 'हो' ला 'हो' म्हणण्याचं काम केल्यामुळे त्यांनी मला १० मार्क  जास्तीचे दिल्याचंसुद्धा  मला आठवतं .
                                  पण त्या इसमाचा काळा कुट्ट आणि वाढलेल्या नखांचा हात पाहून मी घाबरलोच!  .विकास चंद्रकांत माळी उर्फ वीडीओ गेम. कधीही, कोणाचाही , कशाचाही  जर गेम करायचा असेल तर पहिलं पत्र याला जायचं. ही कला त्याला लहानपणापासूनच अवगत होती. म्हणून त्याला विडीओ 'गेम' हे टोपणनाव पडलं असेल बहुदा. त्याचा पहिला बळी लहानपणी विडीओ गेमच्या क्यासेटच्या भांडणावरून गेला म्हणून त्याला हे नाव पडलं असाही काहीजणांचा अंदाज आहे.पण हा पवनपुत्र माझ्या कॉलेज मध्ये काय करतोय ?
 हा प्रश्न पडल्यानंतर त्याचा हातातली  मार्कशीट मी पाहिली. आमच्या संभाषणानंतर त्याचा बाप नगरसेवक आहे हे माझ्या लक्षात आलं आणि तो माझ्या समोर हातात मार्कशीट घेऊन का उभा आहे, ह्याचाही  मला अंदाज आला.ह्या  अपघाताचे ओरखडे मला कदाचित वर्षभर सहन करावे लागणार होते.त्याचा बाजूला एक त्याचाच सावळया रंगाचा आदर्श घेतलेली मुलगी त्याच्या शर्टाचे दंड दुमडलेल्या दंडात, हात घालून उभी होती आणि तिने स्वतःची ओळख 'तुझी वहिनी 'अशी करून दिली. हिच्या ह्या हटके स्टाईल नंतर घाबरलेला विकासचा चेहरा सुद्धा मी टिपला.
                                       ह्या खंडोबाच दर्शन घेतल्यानंतर, आदया  धावत धावत आला.आदित्यचा आदया हा कधीच झाला होता.सकाळपासून हा प्राणी गायब असताना अचानकपणे  उगवल्यानंतर मी REACT व्हायच्या आधीच त्याने माझ्या हातातलं पाणी त्याचा घशात अर्ध केलं आणि त्या गतिमान श्वासांमधून तो उद्गारला,
                                  " DUDE ,लवकर चल..बाहेर मोठा ACCIDENT झालाय." 

No comments:

Post a Comment