आयुष्यात अन्न (फुकट ) आणि डोळ्यावरची झोप या दोन गोष्टींसाठी माणूस काहिही करण्यासाठी तयार होईल. म्हणजे आपल्या देशात जर लोकांना ब्र्हष्टाचार करायचाच असेल तर लाचस्वरुपात देण्यासाठी या गोष्टी पुरेशा असतील.निदान मी तरी ही लाच आनंदाने स्वीकारीन ! दहावीची परीक्षा बऱ्याच प्रयत्नानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर रुईआ महाविद्यालयात मी दाखल झालो. काही जणांना मी ' दाखल केलो ' गेलो असं वाटलं. हा गैरसमज बऱ्याच काळानंतर दूर झाला. त्यासाठी मला माझ I -CARD बरच उपयोगी पडलं. कॉलेज च्या ADDMISSION च्या दिवशी मी माझ्या दैनंदिन सवयीप्रमाणे जरा उशिराच पोहोचलो. तेव्हा रुईआ नाक्याबद्दल मी बराच ऐकून होतो. नाका गजबजून गेला होता. अनेक अनोळखी चेहऱ्यांचा मी पाठलाग करत होतो.शेवटी कॉलेज च्या गेट पाशी मी पोहोचलो. हा गेट ओलांडाण्यापूर्वी मी मनाशी एक पक्का निर्धार केला कारण , एका वेगळ्याच जगात मी प्रवेश करणार होतो.अनेक वलये माझ्या भोवती अचानकपणे निर्माण झाल्यासारखं मला काहीसं वाटू लागलं. अनेक बायका नवारी साड्यांमध्ये मला ओवाळंण्यासाठी हातात हार आणि निरांजनाचं ताटच जणू घेऊन आल्या आहेत असं वाटत असताना मला गेट वरच्या वाचमेन ने अडवलं आणि मी भानावर आलो. बऱ्याचवेळानंतरच्या वाटाघाटी नंतर माझं न ऐकता मला थेट PRINCIPAL च्या OFFICE मध्ये दाखल करण्यात आलं. थेट प्राचार्यांकडे ..ते ही पहिल्याच दिवशी!! तसं म्हणायला गेलं तर अश्या अनेक भेटींचा मी शाळेत साक्षीदार होतोच म्हणा! घड्याळ बऱ्याच वेळ हाताला टोचत असल्यामुळे वाया जाणारी ती वेळ आणि बंद होणारं OFFICE या दोन गोष्टी डोळ्यासमोरून हलत नव्हत्या. PRINCIPAL काहीतरी कामात असल्यामुळे मला बाहेरच्या बेंच वर बसण्याशिवाय काही पर्याय न्हवता.
माझ्या बाजूला एक ,'प्रत्येकाच्या कथेमध्ये असणारी जशी एक तरुणी असते ' ,तशी एक तरुणी बसली होती.तिचे वर्णन सुद्धा,गोरा रंग ,नितळ कांती ,सुडौल बांधा वैगरे असच होतं.खांद्यावरच्या झोळीचं मांडीवर वेटोळं करून त्यावरून आपले स्लीवलेस हातांनी अगदी संपूर्ण शरीर सावरून ती माझ्याबाजूला बसली होती. तिच्या हातावरचं गुलाबी रंगाच घड्याळ तिच्या पेटंट नाजूकतेची जाणीव करून देत होता.अंगावरचा नारंगी रंगाचा कुर्ता डोळ्याला सतत ताजं ठेवत होता.म्हणजे तिच्याकडे न बघता जरी मी दुसरीकडे बघीतल तरी तो रंग डोळ्याचा एका कोपऱ्यामध्ये मिसळत होता.त्यामुळे तिच्यावरून माझी नजर हटवण म्हणजे पावसात समोर असलेल्या गरम गरम तळलेल्या भजीचा पोटात खड्डा असून सुद्धा नुसता वास घेण्यासारखच होतं. अगदी कठीण ! तिने चार्ली परफ्युम मारला आहे की स्प्नेझ डिओ हे विचार करत असतानाच समोरचं OFFICE चं दार उघडलं. आणि मला बोलावण्यात आलं. OFFICE मध्ये बरेच लोक असल्यामुळे नेमके आमचे माननीय प्राचार्य कोण हे कळायला मार्ग न्हवता. हे सगळं बघेपर्यंत OFFICE चा दरवाजा उघडून एक इसम लगबगीने बाहेर आला आणि माझ्या हातातले सगळे DOCUMENTS पडले..आणि ते त्याच्या DOCUMENTS मध्ये मिसळले गेले माझ्या लक्षात येई पर्यंत तो चक्क धावतच बाहेर पडला. मी त्याला थांबवणार इतक्यात प्राचार्यांच्या सेवकाने म्हणजेच चपराश्याने मला बोलवलं. मी धावत धावत त्या मुलाचा पाठलाग करताना अनेकांचे आश्चर्याने ,कुतूहलाने ,केविलवाणे ,हसणारे, तुच्छतेने बघणारे चेहरे मी बघत होतो. त्यात "ती" ,गोरी ,नितळ कांती ,सुडौल बांधा असलेल्या मुलीचा लाजरासुद्धा चेहरा होता. म्हणजे कॉलेज च्या पहिल्याच दिवशी माझ्याबद्दलची नवरासांची कल्पना साकार झाली होती.तो इसम नक्कीच शाळेत पळण्याच्या शर्यतीत पहिला आला असेल. गर्दीतून वाट काढण्याचं तंत्र त्याला अवगत होतं. पहिल्या मजल्यावरून धावत धावत तो नाक्यावर येऊन पोहोचला आणि मी त्याच्या मागून त्याला थांबवण्याच्या हेतूने मागे धापा टाकत होतो. तो अचानक दचकल्यासारखा थांबला आणि कट्ट्याचा आधार घेऊन सावरून बसला.त्याच्या नजरेचा पाठलाग करून तो कुठे बघत होता ह्याचा अंदाज मी घेत होतो.त्याच्या समोर एक मुलगी एका मुलाला अगदी मिठी मारून बसली होती. ते सुलभशृंगार दृश्य तो हताशपणे बघत होता आणि त्या वेळी मला काहीतरी उमगल्यासारखं झालं. त्याचा डोळ्यातला अश्रू घरंगळून माझ्या DOCUMENTS वर पडला. माझी मार्कशीट त्याच्या अश्रूंनी भिजून निघत होती.
कॉलेज च्या पहिल्या दिवशी कोणाचतरी ADDMISSION होत असताना कोणालातरी LEAVING CERTIFICATE मिळालेलं होतं...
ohhhhhhhhhhhh....................sahi!!!!!!!!!!!
ReplyDeletedamn sahi.....bhari.... :D
jabardasttt.!!!!! nice one bro...
ReplyDeletethanx abolyaa and !!gaurav
ReplyDeleteMassta khp chaan lihala ahes
ReplyDeleteLihit raha
wahh!! mayuresh khooopach sundar lihitos tu..kilavun tevlas vachtana..gr8..
ReplyDeleteSahi yaar!!! Awesome!! Lai Bhaari!
ReplyDelete